Pune Crime | पाच वर्षीय शाळकरी मुलीवर बस चालकाचा लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शाळेच्या बस चालकाने पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यात उघडकीस आला आहे. गौतम भांबुरे Gautam Bhambure (रा. भांबुरवाडी, ता. खेड) असे आरोपीचे (Pune Crime) नाव असून, खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

या प्रकराबाबात मुलीच्या वडिलांनी खेड पोलिसांत (Khed Police) तक्रार दिली होती. पोलिसांना मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत पाच वर्षीय बालिका ही राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे एका खासगी शाळेत आहे. आरोपी भांबुरे बसचालक असून, तो शाळकरी मुलांना शाळेत नेण्याचे आणि घरी सोडण्याचे काम करतो. शनिवारी (दि.12) रोजी आरोपी भांबुरे याने पिडीत मुलीला घरी नेत असताना, राजगुरुनगर शहरालगत भांबुरवाडी घाटात एका अज्ञात ठिकाणी बस थांबवून मुलीसोबत लैगिक चाळे केले.

 

आरोपिने त्याच्या गुप्तांगास मुलीला बळजबरीने हात लावण्यास सांगितले. याबाबत घरी कोणाला सांगू नको,
अशी ताकीद देखील चिमुकलीला दिली. मात्र, मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानुसार मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली.
आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट (Assistant Police Inspector Navnath Ranagat) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | school bus driver sexually assaults five year old school girl incidents in khed taluka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stand-Up Comedian Veer Das | स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने पुन्हा रद्द केला शो, कारण ऐकुन तुम्हालाही य़ेईल हसु

Actress Neha Sharma | नेहा शर्माच्या बोल्ड स्टाइलसमोर या अभिनेत्री पडतात फिक्या, पहा तिचा हॉट लुक

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे