Pune Crime | आई-वडील शाळेत मीटिंगसाठी गेले; मुलीची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एका मुलीने (School Girl Suicide) राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide In Pune) केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीचे पालक शाळेतील मीटिंगसाठी गेले असताना मुलीने हे पाऊल उचलले. हडपसर (Hadapsar) परिसरातील न्यू अ‍ॅमनोरा पार्क परिसरात (New Amanora Park) ही घटना घडली. (Pune Crime)

 

मृत मुलीचे नाव अवंतिका कुलाशेखर (वय 17) आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अवंतिकाचे आई – वडील आज तिच्या शाळेत मीटिंगसाठी गेले होते. अवंतिकाचा लहान भाऊ देखील शाळेत गेला होता. ती घरी एकटीच होती. (Pune Crime)

 

शाळेतील मीटिंग आटोपून सकाळी आई – वडील घरी परतले. लिफ्टने ते वर जात असतानाच अवंतिकाने घराचा दरवाजा आतून बंदकरून चौदाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.

 

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. यानंतर पंचनामा करण्यात आला.
अवंतिकाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime | School girl committed suicide by jumping from the 14th floor while her parents were attending a parent meeting incident in new amanora park hadapsar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा