Pune Crime | डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यु; लोहगावातील पठारेवस्तीतील घटना

पुणे : Pune Crime | भरधाव जाणार्‍या डंपरची धडक बसल्याने सायकलवरुन क्लासला जाणाऱ्या शाळकरी मुलीचा मृत्यु (School Girl Death) झाला. रोशनी बाबा अंगरखे Roshani Baba Angarkhe (वय १६, रा. शोर्या पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे मृत्यु पावलेल्या मुलीचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी तिचे वडिल बाबा पंढरीनाथ अंगरखे Baba Pandharinath Angarkhe (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी अंगरखे ही सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सायकलवरुन क्लासला जात होती. पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ (MG Brilliant School) भरधाव आलेल्या
डंपरने तिच्या सायकलला घासून गेली. त्यामुळे रोशनी डंपरच्या चाकाखाली येऊन त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title :- Pune Crime | School girl dies in dumper collision; Incidents in Lohgaon Pathare Wasti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात; हवामान खात्यानं नेमकं काय म्हटलं?

 

Gold Price Today | सोने-चांदीत तेजी, सोने 113 रुपयांनी महागले, चांदीच्या किमतीत 428 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर