Pune Crime | TRUE CALLER आयडीवरील नाव पाहून वडिल संतापले अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका मुलीने आपल्या मैत्रिणीच्या (Girlfriend) मोबाईलवरून आपल्या वडिलांना फोन लावला. वडिलांच्या मोबाईलवर मात्र, पुरुषाचे नाव आले. त्यामुळे मुलीने कोणत्यातरी मुलाच्या मोबाईलवरुन फोन केल्याचा संशय आल्याने वडिलांनी मुलीसह घरातील सर्वांना मारहाण (Beating) केल्याने हे प्रकरण (Pune Crime) पोलिसांपर्यंत (Pune Police) गेले.

 

याप्रकरणी एका ४० वर्षाच्या मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 45 वर्षाच्या वडिलांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना 6 मे रोजी खडकीमध्ये घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीचे पती आहेत. त्यांच्या मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरुन आपल्या वडिलांना फोन केला (Called the Father) होता. तिच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये TRUE CALLER वर पुष्पराज असे नाव आले. त्यामुळे वडिलांना आपल्या मुलीने कोणाच्या तरी मुलाचे मोबाईलवरुन फोन केल्याचा संशय आला. त्यावरुन त्यांनी तिला लाथाबुक्यांनी मारहाण करुन फरशी पुसण्याचे लाकडी दांडक्याने दंडावर, पोटावर, छातीवर तसेच पाठीवर मारहाण करुन जखमी केले.

 

तिला सोडविण्यास फिर्यादी गेल्या असताना त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दुसरी मुलगी हिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आपले वडिल आणि फिर्यादींचे सासरे यांनाही हाताने मारहाण करुन फरशी पुसण्याच्या दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.
खडकी पोलिसांनी अशा संशयखोर वडिलांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कदम (API Kadam) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Seeing the name on the TRUE CALLER ID the father got angry and

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा