Pune Crime | पुण्यातील तरूणीला अश्लील मेसेज करणं कोल्हापुरातील युवकाला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष (Marriage Lure) दाखवून अश्लील मेसेज (Offensive Message) करणाऱ्या कोल्हापूरातील (Kolhapur) तरुणाला पुण्यातील (Pune Crime) तरुणीने चांगलाच इंगा दाखवला आहे. आरोपी तरुणाने अश्लिल मसेज पाठवल्यानंतर तरुणीने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळून पुण्यात (Pune Crime) आणले.

 

निलेश सुरेश कांबळे Nilesh Suresh Kamble (वय-30 रा. केर्ली ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील (Pune Crime) तरुणीशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने पीडित तरुणीशी अश्लिल संभाषण केले होते. तसेच तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तरुणीशी संवाद साधताना अश्लिल बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं होतं.

 

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाहीतर आरोपीने पीडित तरुणीला फोन करुन अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच फेसबूक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. आरोपीच्या या कृत्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोघ घेण्यास सुरुवात केली.

पोलीस आरोपीचा शोध घेत होते मात्र तो नेहमी वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता.
अखेर तांत्रिक तपासात (Technical Investigation) आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांच्या एका पथकाने केर्ली येथे जाऊन आरोपीची उचलबांगडी करुन त्याला पुण्यात आणले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | sent offensive messages on social media to young woman from pune got arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती