Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटच्या फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणार्‍या टँकरमालकासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोना लसीच्या (Corona Vaccine) उत्पादनामुळे जगभर चर्चेचा विषय असलेल्या सिरम इन्स्टिट्युटच्या (Serum Institute of India Pune) अंतर्गत कंपनीने मागविलेल्या फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) टँकर मालकासह चालक व क्लिनरवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

टँकर मालक उमेश मधुकर शिंदे (रा. सोलापूर), चालक सागर भैरवनाथ जाधव (वय २७, रा. सोलापूर) आणि क्लिनर गणेश तानाजी जाधव (वय २१, रा. सोलापूर) व इतर अशी गुन्हा दाखल (Pune Crime) झालेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटच्या वतीने अशिष माळी (वय ३२, रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार सोलापूर रोडवरील आकाशवाणी कर्मचारी वसाहतीसमोर २२ नोव्हेबरला दुपारी साडेतीन ते २३ नोव्हेबर दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरम इन्स्टिट्युट या कंपनीचे अंतर्गत कंपनीने फर्नेस ऑईलची मागणी नोंदविली होती.
त्याप्रमाणे कंपनीला पोहोच करण्यासाठी टँकरमध्ये फर्नेस ऑईल भरण्यात आले होते.
हे ऑईल कंपनीत पोहचण्यापूर्वी सोलापूर रोडवर (Pune-Solapur Road) टँकरमधील ३ टन ऑईल काढून त्या फॅर्नेस ऑईलमध्ये भेसळयुक्त मिश्रण भरण्यात आले.
कंपनीची ८ लाख ५० हजार ७३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या (Pune Police Crime Branch) पथकाने उघडकीस आणला.
त्यानंतर कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Serum Institute of india pune charges three, including tanker owner, for tampering with furnace oil crime registered in hadapsar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SGB Scheme | सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वतात सोने खरेदी करण्याची संधी, येथे जाणून घ्या कधी होईल सुरुवात

Sanjay Raut | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले – ‘नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री की पहाटे?’

Vaishali Agashe | LIC च्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली आगाशेंची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड