Pune Crime | बाणेर परिसरातील मसाज सेंटरमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; तीन तरुणी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील बाणेर परिसरात मसाज सेंटरच्या (Massage Centre Baner) नावाखाली सुरू असेलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेऊन मसाज सेंटर चालविणाऱ्या महिलेच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पुष्पा केशव शिंदे (वय 32, रा. सद्गुरू दर्शन सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे) हिच्याविरुद्ध आयपीसी 370, 34 सह इटपा अॅक्ट (The Immoral Traffic (Prevention) Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार अण्णा दिलीप माने (Anna Dilip Mane) यांनी फिर्याद दिली आहे.

बाणेर परिसरातील गणराज चौकाजवळ असलेल्या एका निवासी इमारतीमध्ये स्पंदन स्पा (Spandan Spa)
नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानंतर पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून घेतली.
पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतले.
आरोपी पुष्पा शिंदे ही महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | ‘Sex’ racket busted in massage center in Baner area; Three young women in custody

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या