Pune Crime | रेंट अ‍ॅग्रीमेंट घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घराचे रेंट अ‍ॅग्रीमेंट (Rent Agreement) घेण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या एका तरुणाने घरमालकाच्या (Homeowner) 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उस्मान गुलाम खान Usman Ghulam Khan (वय – 21 रा. भोसरी) याला अटक (Pune Crime) केली आहे.

 

याबाबत पीडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी उस्मान खान याच्यावर आयपीसी 354, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कायद्यानुसार (Protection of Children from Sexual Offence Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) दुपारी 12.20 च्या सुमारास घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शनिवारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची 15 वर्षाची मुलगी घरामध्ये एकटी होती. आरोपी उस्मान खान हा घराचे रेंट अ‍ॅग्रीमेंट घेण्याच्या बहाण्याने घरात आला. घरामध्ये मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घाडगे (API Ghadge) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Sexual harassment of a minor girl under the pretext of taking a rent agreement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा