Pune Crime | पुण्यातून वाहनांचे सायलेन्सर चोरणार्‍या टोळीला बेड्या ! गुन्हे शाखेच्या युनीट-5 ची कारवाई, 16 सायलेन्सर जप्त

पुणे : Pune Crime | शहरातील विविध भागातून मोटारींचे सायलेन्सर चोरणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनीट पाचने अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख २० हजारांचे १६ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी भागातील वाहनांचे सायलेन्सर चोरी केले होते. सायलेन्सर मधील मौल्यवान प्लॅटिनम धातु मिश्रीत माती काढुन ती परराज्यातील आरोपींना विक्री केल्याचे निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil) यांनी दिली आहे. (Pune Crime)

आरिफ सलीम शेख (वय १९ रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (वय २३), साहील वसीम शेख (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), रहिम खलील शेख (वय २४ रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (वय २३ महंमदवाडी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

रस्त्यालगत उभ्या केलेल्या मोटारींचे सायलेन्सर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर युनीट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी हडपसर परिसरातून सायलेन्सर चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून १६ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर
(ACP Narayan Shirgaonkar ), पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,
पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, उपनिरीक्षक चैताली गपाट, पोलीस अंमलदार रमेश साबळे, आश्रुबा मोराळे,
राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले,
दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे, शशीकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, अमित कांबळे,
विलास खंदारे, अमित कांबळे, संजयकुमार दळवी स्वाती गावडे यांनी केली आहे.

Web Title :- Pune Crime | Shackles to the gang that steals the silencer of the vehicles that steal from Pune! Pune Police Crime Branch Unit-5 action seized 16 silencers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा