Pune Crime | 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | १३ वर्षाच्या मुलीला कारमध्ये बसवून तुला जेवायला घेऊन जातो़ नवीन कपडे घेतो, असे बोलून तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन (Shameful behavior) करण्याचा प्रकार समोर आला आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एकाला अटक केली (Pune Crime ) आहे.

 

भीमराव शंकर पिंपळे (वय ५२, रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या मुलीचा तोंडओळखीचा आहे. गुरुवारी सकाळी मुलगी मुंढवा (Mundhwa) येथील शाळेत गेली असताना आरोपीने तिला शाळेच्या गेटच्या बाहेर बोलावले. तिला त्याने कारमध्ये बसायला सांगितले. त्यानंतर त्याने मुलीला त्याच्या मोबाईलवर फोन करायला सांगितला. शाळेत येताना सायकल आणू नको. तू वडगाव शेरी (wadgaon sheri) शेवटचा बसस्टॉप येथे ये. मी तुला माझे कारमधून शाळेत सोडतो. तसेच तुझी शाळा सुटल्यानंतर तुला जेवण करायला घेऊन जातो व तुला नवीन कपडे घेतो, असे बोलून आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन (Pune Crime) केले. ही बाब मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Shameful behavior of a 13-year-old girl sitting in a car; Incidents in Chandan nagar police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक

Diet & Aging | तुम्हाला वेगाने वृद्ध करतात खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

Katrina Kaif | ‘या’ अभिनेत्याचा वाईट वागणुकीमुळं सलमान खान समोर रडली कतरिना, जाणून घ्या कोण होता तो अभिनेता?