Pune Crime | दिवसाढवळ्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची पैशांची बॅग पळवली; परिसरात खळबळ

पुणे / शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिक्रापूर येथील शिवसेना तालुका उपप्रमुखाची (Shivsena taluka deputy chief) पैशांची बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चोरुन (money bag snatched) नेली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गर्दीच्या चौकातून हातातील पैशांची बॅग हिसका मारून चोरुन नेली. बॅगेमध्ये तीन लाख रुपये होते. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) दोन अज्ञांत युवकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.

शिरुर तालुक्यातील पारोडी येथील हॉटेल व्यावसायिक तसेच शिवसेना शिरुर तालुका उपप्रमुख रोहिदास शिवले (Rohidas Shivale) हे शिक्रापूर येथील पाबळ चौकातील (Pabal Chowk) अ‍ॅक्सिस बँकेत (Axis Bank) पैसे काढण्यासाठी मुलासोबत आले होते.
त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यानंतर त्यांनी दोन लाख रुपये मुलाला दिले.
उर्वरित तीन लाख पिशवीत ठेवून दुचाकीवरुन जात होते.

त्यावेळी अचानकपणे दोन युवक रुमाल बांधून दुचाकीवरुन आले.
त्यांनी शिवले यांच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगात चाकण चौकाच्या (Chakan Chowk) दिशेने पळून गेले.
या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. (Pune Crime )

याप्रकरणी रोहिदास बाजीराव शिवले (वय-52 रा. शिवतक्रार म्हाळुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे (API Ranjit Pthare) व पोलीस शिपाई अविनाश पठारे (Avinash Pthare) करीत आहेत.

हे देखील वाचा

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई

Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Shiv Sena taluka deputy chief’s money bag snatched in broad daylight; Excitement in the area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update