Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ताडीवाला रोड (Tadiwala Road, Pune) येथे राहणार्‍या एका इंग्लिश मिडियम स्कुलमधील (English Medium School, Pune) ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ इतकेच नाही तर आजोबा, चुलत मामा यांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ ते मे २०२१ दरम्यान बिहार (Bihar) आणि ताडीवाला रोड येथे घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी २९ वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पिडित मुलीचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park, Pune) एका शाळेत ही ११ वर्षाची मुलगी शिकत आहे.
समुपदेशक महिला शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन त्यांना गुड टच, बॅड टच (Good Touch, Bad Touch Lesson) विषयी समजावून सांगत होत्या.
त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या चार वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने संबंध करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिचा १४ वर्षाचा मोठा भावाने तिच्याबरोबर बर्‍याच वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) करुन धमकी दिली.
जानेवारी २०२१ मध्ये तिचे आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले तर मे २०२१ मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे.
बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे (API Sapkale) तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Shocking 11 year old girl sexually abused by father brother and grandfather cousin While teaching Good Touch and Bad Touch the victim said Apabiti

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा