Pune Crime | धक्कादायक ! अंडाबुर्जीवाल्याच्या मारहाणीत 2 कचरावेचकांचा मृत्यू

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उन्हामध्ये कचरा (Garbage) वेचल्यामुळे थकवा आल्याने चार जण विश्रांतीसाठी बसले होते. तेथे अंडाभुर्जीची हातगाडी लावणाऱ्या तरुणाने दोनदा बांबुने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच गरम पाणी (Hot Water) त्यांच्या अंगावर टाकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी 50 वर्षे वयाच्या व 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू (Death) झाला. हा प्रकार सासवड (Saswad) येथील भोंगळे वाईन्सलगत असलेल्या कट्ट्यावर (Pune Crime) घडला आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले (ASI Sunil Chikhale) यांनी सोमवारी (दि.30) रात्री सासवड पोलीस ठाण्यात (Saswad police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप Nilesh alias Pappu Jaywant Jagtap (रा. ताथेवाडी, सासवड, ता. पुरंदर) याला अटक (Arrest) केली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप (Police Inspector Annasaheb Gholap) यांनी आज (मंगळवार) माहिती दिली असून खून (Murder) झालेल्या दोन पुरुषांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर इतर दोन जखमी व घटनेचे साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम (Laxmikant Nathyaba Kadam) व शेवंताबाई जाधव (Shevantabai Jadhav) यांना देखील मारहाण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune Crime)

सासवड येथील भोंगळे वाईन्स लगतच्या कट्ट्यावर 23 मे रोजी दुपारच्या वेळी कचरा गोळा करणारे बसले होते. यावेळी साक्षीदार (Witness) आणि इतरांना आरोपी पप्पु जगताप याने अगोदर हाकलण्याचा प्रयत्न केला. जगताप हा त्याठिकाणी अंडाभुर्जीची गाडी लावतो. त्याच ठिकाणी हे कचरा वेचणारे बसले होते. त्यामुळे तो त्यांना मारहाण करुन उठवत होता. त्या ठिकाणी नेहमी बसणारे वयस्कर व्यक्ती अंदाजे वय 60 व अनोळखी पुरुष अंदाजे वय 50 यांना जास्त मारहाण केली.

तर शेवंताबाई जाधव (वय-60 रा. सासवड) व लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम यांनाही आरोपीने बांबूने मारहाण केली. मारहाणीनंतर चारपैकी तिघेजण तिथेच पडून होते. थोड्यावेळाने पुन्हा आरोपीने त्या तिघांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उठत नसल्याने त्यांच्या अंगावर उळकते पाणी टाकले. कचरावेचक जागेवरुन उठत नसल्याने आरोपीने त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली.

बेदम मारहाण केल्याने चारपैकी दोघेजण निपचीत पडले होते. त्यानंतर कोणीतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. यानंतर 24 मे रोजी 50 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर सोमवारी (दि.30) रात्री 60 वर्षे वयाच्या व्यक्तीचा ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पोलिसांनी साक्षीदार तपासून काल रात्री उशिरा IPC 302, 206 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | Shocking! 2 garbage collectors killed in saswad of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त