Pune Crime | धक्कादायक ! आईच्या प्रियकराकडून 21 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आई आणि बहिणीला मारुन टाकण्याची धमकी (Death Threat) देऊन एका 21 वर्षीय तरुणीवर ती अल्पवयीन (Minor) असल्यापासून वेळोवेळी बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे उघडकीस आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) आरोपीविरुद्ध 376, 376 (2) n, 323, 504, 50, 6 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण Protection of Children from Sexual Offences Act (POCSO Act) करण्याच्या काद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपी जनार्दन सोमाजी शितोळे Janardhan Somaji Shitole (वय-40 रा. बहुळ ता. मावळ) याला अटक (Arrest) केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा आईचा प्रियकर (Boyfriend) आहे.

याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2014 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील लॉज, भंडारा डोंगराच्या (Bhandara Dongar ) जंगलात आणि फिर्यादीच्या राहत्या घरी वेळोवेळी घडला आहे. पीडित तरुणीने आरोपीचे अत्याचार सहन न झाल्याने आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शितोळे हा फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असते. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केले. फिर्यादी तरुणीच्या आई व बहीण यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सोमवारी (दि.11) रात्री दीडच्या सुमारास आरोपीने फिर्यादी तरुणीवर जबरदस्ती केली. या अत्याचाराबाबत तरुणीने आईला सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ करुन तिला हाताने मारहाण (Beating) केली.

आरोपी कडून होत असलेल्या अत्याचाराला वैतागून तरुणीने आईला याबाबत सांगितले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
यानंतर आईसोबत पोलीस ठाण्यात जाऊन पीडित तरुणीने फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदेवाड (PSI Madewad) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking! 21 year old girl raped by mother’s boyfriend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून