Pune Crime | धक्कादायक ! हडपसरमधील 22 वर्षीय तरूणीला लॉजवर पट्ट्याने मारहाण, मैत्रीणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढव्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकमेकांचे मित्र असताना त्याने लग्नाची मागणी घातली. त्याला तरुणीने नकार दिल्यावर तिला जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी हडपसरमध्ये (Hadapsar) राहणार्‍या एका २२ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शकिल बागवान (Shakil Bagwan) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी शकिल हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाची मागणी घातली होती. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता. त्यानंतरही तो फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करीत व वाटेत अडवत असे. त्याच्याविरुद्ध फिर्यादी यांनी गेल्या महिन्यात २० मे रोजी हडपसर पोलीस ठाण्यात विनयभंगाची (Molestation Case) फिर्याद दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानी १८ जून रोजी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घेऊन विन्डस फॉअर रिसॉर्ट येथे नेले. तेथे त्यांना कंबरेच्या बेल्टने मारहाण करुन त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांना सेव्हन ट्रीटस हॉटेल येथे नेऊन तेथेही त्यांच्याशी शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले (Pune Rape Case). रविवारी रात्री सात वाजता त्याच्या तावडीतून फिर्यादी यांनी आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking 22 year old girl from Hadapsar beaten up at lodge raped in Kondhwa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा