Pune Crime | धक्कादायक ! पिंपरीत DTDC कुरिअरने मागवल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | औरंगाबाद येथे डी. टी. डी. सी कुरिअर कंपनी मध्ये (DTDC Courier Company Aurangabad) अवैधपणे तलवारीचा साठा (Sword Stock) आढळून आल्यानंतर पुणे पोलीस (Pune Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलीस ठाण्याचे (Dighi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Senior Police Inspector Dilip Shinde) यांनी हद्दीतील कुरिअर कंपनीत जाऊन येणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग (Parcel Scanning) करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार केलेल्या तपासणीत कुरिअरने मागवलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा 3 लाख 22 हजार रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

उमेश सुद Umesh Sud (रा. घर नं.40, ग्रीन अ‍ॅव्हेन्यु, अमृतसर – Amritsar, पंजाब – Punjab), अनिल होन Anil Hon (रा. औरंगाबाद), मनिंदर Maninder (रा. खालसा फोर्स शॉप, घंटा घर कॉम्पलेक्स, मार्केट दरबार साहेब, अमृतसर, पंजाब), आकाश पाटील Akash Patil (रा. मु. पो. चितली ता. राहता जि. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाऊनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या.

डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे. आरोपी उमेश सुद याने अनिल होन याला 2 लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठवले होते. हे बॉक्स 1 एप्रिलला एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी दोन लाकडी बॉक्समधील 92 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा एकूण 3 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

आरोपी मनींदर याने आरोपी आकाश पाटील याला एका बारदानाच्या कपड्यामध्ये पार्सल पाठवले होते. डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या दिघी येथील गोडाऊनमध्ये रविवारी (दि.3) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीच्या 5 तलवारी जप्त केल्या.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर (DCP Manchak Ipper),
सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे (APC Prerna Katte)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश जाधव (Police Inspector Prakash Jadhav),
पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी (PSI Dnyaneshwar Dalvi),
पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोलीस हवालदार अमोल जाधव, शेखर शिंदे, घुगरे, चालक पोलीस नाईक हेमंत डुंबरे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Shocking 97 swords 2 cookers 9 sheaths ordered by DTDC courier In Pimpri

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा