Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील खराडी ते लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये 20 वर्षीय युवतीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेजारी राहणार्‍या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) अटक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी व आरोपी तरुण हे लोणी काळभोरमध्ये एकमेका शेजारी राहण्यास आहेत. १३ जानेवारी रोजी या तरुणाने तरुणीला आपण बाहेर जेवायला जाऊ. मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, असे म्हणून तिला रात्री आठ वाजता खराडी (Kharadi) येथील पाजी दा ढाबा येथे कारमधून आणले. तेथे जेवण केल्यानंतर परत घरी जाताना त्याने खराडी ते लोणीकाळभोरकडे (Kharadi to Loni Kalbhor Road) जाणार्‍या रस्त्यावर आडबाजूला कार थांबविली व तिथे तिच्यावर बलात्कार (Pune Crime) केला. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Shocking A 20-year old girl was raped in a car on Kharadi to Lonikalbhor road in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा