Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

पुणे : Pune Crime | एका पाठोपाठ तीन मुली झाल्याने जळगावमधील (Jalgaon) एका निर्दयी बापाने आपल्या ६ दिवसांच्या मुलीची पुण्यातील दोघा तृतीयपंथीयांना (Transgender) विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या (Pune Crime Branch) पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. कर्वेनगर येथील संभाजीनगरमध्ये राहणार्‍या दोघा तृतीयपंथींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीला त्यांनी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी विकत घेतले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २३ सप्टेबर २०२२ रोजी हे बाळ ताब्यात घेतले. जळगावमधील बापाकडून ६ दिवसांची ही मुलगी विकत घेताना त्यांनी दत्तक घेण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी या मुलीला विकत घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (Sub-Inspector of Police Suresh Jaibhai)
यांनी जिल्हा बाल कल्याण समितीशी (District Child Welfare Committee) संपर्क साधून ही माहिती दिली.
जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर (Dr. Rani Khedikar) तसेच सदस्य वैशाली गायकवाड (Vaishali Gaikwad), श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांनी याच्या देखभालीसाठी
बालकाला एका संस्थेकडे सुपूर्त केले आहे. या दोघा तृतीयपंथींनी मुलगी दत्तक घेतल्याची कबुली दिली असून
तिच्या आईवडिलांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.

मुलीची विक्री करणारा बाप आणि खरेदी करणारे तृतीयपंथी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)
अधिनियम २०१५ चे कलम ८० अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस (Pune Police) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! A six-day-old daughter was sold to a third party by a cruel father in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Encroachment On Hills In Pune | येवलेवाडी परिसरात ‘डोंगरफोड’ करून ‘ओढे बुजवून’ वेगाने विकास कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते कायमच ‘खड्डयात’; बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासच अनियोजीत रस्त्यांच्या ‘घाट’

Devendra Fadnavis | वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प आणून विरोधकांना उत्तर देऊ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Ashok Gehlot | समर्थक आमदारांचे राजीनामास्त्र गेहलोत यांच्यावरच उलटणार? अध्यक्षपदाबाबत ही मोठी माहिती आली समोर