Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात प्रेयसीला अटक, मुलीनेच कट रचल्याचे तपासात आले समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमसंबंधातून (Love Affair) पुण्यातील शिवणे (Shivne) परिसरात एका तरुणाचा सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना 16 मार्च रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) केलेल्या तपासात मृत तरुणाच्या (Pune Crime) प्रेयसीनेच कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने प्रेयसीला देखील अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणात अटक झालेल्याची संख्या 5 झाली आहे.

 

प्रद्युन्य प्रकाश कांबळे Pradyunya Prakash Kamble (वय-22 रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता Senapati Bapat Road) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय विजय पायगुडे Ajay Vijay Paygude (वय-19) विजय किसन पायगुडे Vijay Kisan Payagude (वय-50) वंदना विजय पायगुडे (वय-40 सर्व रा. साई श्रद्धा रेसीडन्सी, दांगट पाटील नगर, शिवणे-Shivne), सागर गोविंद राठोड Sagar Govind Rathod (वय-21 रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी-Dahanukar Colony, कोथरुड – Kothrud) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पोलिसांनी मयत तरुणाची प्रेयसी प्राजक्ता पायगुडे (Prajakta Paygude) हिला कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

 

16 मार्च रोजी दांगट पाटील नगर (Dangat Patil Nagar) मध्ये प्राजक्ता हीच्या आई, वडील, भाऊ व त्याचा मित्र अश्या चौघांनी मिळून धारदार शस्त्र, सिमेंटचे गट्टू व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत कांबळे याचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान या कारस्थानात प्राजक्ता हिचा देखील समावेश असल्याचा खुलासा झाल्याने तिला ही आरोपी करुन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटी कलमांतर्गत (Atrocities) Act गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत.

आरोपी प्राजक्ता व मयत प्रद्युन्य यांच्यात प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. घटनेच्या दिवशी मयत प्राजक्ताला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. संध्याकाळी तिचे पालक व भाऊ आल्यावर त्यांना प्रद्युन्य घरी आल्याचा राग आला म्हणून रागाच्या भरात आधी घरात आणि नंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केल्यावर इमारतीच्या बाहेर रस्त्यावर त्याला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कांबळे याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

कांबळे याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. दरम्यान मृत्यूपूर्वी मयत कांबळे याचे डोळे व त्याच्या गुप्तांगाला इजा करुन छळ करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. तसेच पोस्टमार्टेम (Postmortem) मध्ये काहीच आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आरोपी प्राजक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रद्युन्य कांबळे याच्या मृत्यूचा धक्का बसल्याने प्राजक्ताने स्वत: ला घरात कोंडून घेऊन ओढणी ने गळफास घेण्याचा व नस कापून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती लोकांनी दिली. पोलिसांनी लगेच घरी जाऊन दार तोडून तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे,
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke),
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe), मनोज बागल (PSI Manoj Bagal),
पोलीस उपनिरीक्षक आर.एन. पार्वे (PSI R.N. Parve), अमोल सावंत (PSI Amol Sawant)तसेच पोलीस ठाण्यातील पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking ! Beloved arrested in ‘murder’ case of love affair in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sugar Level Control Tips | मधुमेहाच्या समस्येमध्ये ‘या’ आहेत फायदेशीर वनस्पती; वाढलेली शुगर झटपट कमी करतील, जाणून घ्या

 

Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

 

Low Carbs For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण बिनधास्त खाऊ शकतात ‘या’ 5 गोष्टी, ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची करू नका चिंता