Pune Crime | धक्कादायक ! जिवंत पत्नीचा तयार केला मृत्यू दाखला; पतीसह 7 जणांवर FIR, प्रचंड खळबळ

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील मंचर (Manchar) येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. जिवंत पत्नीचा कोरोनाने मृत्यू (Corona Death) झाल्याचे दाखवून बनावट मृत्यूचा दाखला (Bogus Death Certificate) तयार करून अनामत रक्कम ठेव पावती रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतीसह सासरचे 5 व मंचर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व एक महिला कर्मचारी, अशा एकूण 7 जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

 

पती गीताराम आबाजी पोखरकर (Gitaram Abaji Pokharkar) (वय 38), सासरे आबाजी लक्ष्मण पोखरकर (Abaji Laxman Pokharkar) (वय 65), सासू ठकूबाई आबाजी पोखरकर (Thakubai Abaji Pokharkar) (वय 60), दीर गजानन आबाजी पोखरकर (Gajanan Abaji Pokharkar) (वय 42), नणंद शांताबाई बाळू नवले (Shantabai Balu Navale) (वय 44 सर्व रा. पिंपळगाव खडकी ता. आंबेगाव), मंचरचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने (K. D. Bhojane) (वय 47), मंचरच्या ग्रामपंचायत कर्मचारी स्नेहल स्वप्नील गुंजाळ (Snehal Swapnil Gunjal) (वय 26), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी, मंचरमधील कुलस्वामी को. ऑफ क्रेडिट सोसायटीत ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्यामुळे 39 हजार रुपये रक्कम काढण्यासाठी अक्षय मनकर (Akshay Mankar) व त्यांची बहिण आशा गीताराम पोखरकर (Asha Gitaram Pokharkar) या गेल्या होत्या.
त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, आशा यांचा मृत्यू झाला आहे,
आणि त्यांचे वारसदार पती गीताराम पोखरकर यांनी सदर रक्कम काढून नेली आहे.
असं ऐकल्यावर अक्षय मनकर आणि बहिण आशा यांना धक्का बसला.
‘माझी बहीण आशा ही माझ्याबरोबरच आहे, असं अक्षय यांनी सांगितले. त्यामुळे पतसंस्थेत गोंधळ उडाला.
तर तेथील कर्मचा-यांनी आशा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा मंचर ग्रामपंचायतीचा (Manchar Gram Panchayat) दाखला दाखविला.

दरम्यान, यानंतर असा मृत्यूचा खोटा दाखला बनवून पतीनेच पैसे गायब केल्याचं आशा पोखरकर यांनी घोडेगाव कोर्टात (Ghodegaon Court) सांगितलं.
ॲड. विठ्ठल पोखरकर (Add. Vitthal Pokharkar) यांनी आशा यांच्या वतीने न्यायलयात युक्तिवाद केला.
यानंतर कोर्टाने मंचर पोलिसांना याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिलेत.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश होडगर (Police Inspector Satish Hodgar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र हिले (Police Naik Rajendra Hille) करत आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Shocking Death certificate prepared by living wife FIR against 7 persons including husband huge commotion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

 

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित