Pune Crime | धक्कादायक ! वारजे माळवाडीमध्ये नातीनं केला आजीचा खून; जाणून घ्या

पुणे : Pune Crime | लोन अ‍ॅपवरुन (Loan App) घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून (Murder In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजेतील आकाशनगर भागात एका ज्येष्ठ महिलेच्या खूनाच्या गुन्ह्याचा वारजे पोलिसांना (Waraje Police) छडा लावण्यात यश आले आहे. (Pune Crime)

गौरी सुनिल डांगे Gauri Sunil Dange (वय २४, रा. आकाशनगर, वारजे) असे खून केलेल्या नातीचे नाव आहे. सुलोचना सुभाष डांगे Sulochana Subhash Dange (वय ७०) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. पोलिसांनी गौरी सुनिल डांगे हिचीच सुरुवातीला फिर्याद घेतली होती. मात्र, पोलीस तपासात तिनेच हे कृत्य केल्याचे रात्री उशिरा निष्पन्न झाले. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील आकाशनगर परिसरात डांगे, त्यांचा मुलगा आणि नात रहायला आहे. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो. सुलोचना डांगे या मंगळवारी घरी एकट्या होत्या. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो. नात नोकरी करते. ते दोघेही कामाला गेले होते. पाण्याची मोटार सुरु होत नसल्याने त्यांचा भाडेकरु सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्यांचे दार उघडेच होते. त्यांनी आत जाऊन पाहिले तर सुलोचना या खाली पडल्या होत्या. घरातील कपाट उघडे होते. त्यातील वस्तू अस्थाव्यस्थ पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke) व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुनिल डांगे व गौरी डांगे यांच्याकडे चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांच्या माहितीत तफावत दिसून येत होती. त्यानंतर पोलिसांनी गौरीकडे सखोल चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला.

गौरी हिने लोन अ‍ॅपद्वारे कर्ज (Loan) घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात आला होता.
सायबर चोरटे तिला ब्लॅकमेल करीत होते.
त्यातून तिने कर्ज फेडण्यासाठी मंगळवारी सकाळी आजीचा खून केला.
तिच्या घरातील १ तोळ्याचे मंगळसुत्र व ३६ हजार रुपये घेऊन पळ काढला.
त्यानंतर तिने ते मंगळसुत्र २० हजार रुपयांना विकले.
त्यातील १३ हजार रुपये तिने सायबर चोरट्याने दिलेल्या खात्यावर भरले.
हा सर्व प्रकार समोर आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (Sub-Inspector of Police Narendra Mundhe) यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

Web Title :- Pune Crime | Shocking! Grandson killed grandmother in Warje Malwadi; find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 3 पोलिस निरीक्षकांसह 4 PSI च्या अंतर्गत बदल्या