Pune Crime | धक्कादायक! व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विस्कीमध्ये (Whiskey) गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर (Homeopathy Doctor) बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आला आहे. तसेच आरोपीने महिला डॉक्टरला त्यांचे अश्लील व्हिडोओ (Pornographic Videos) व्हायरल (Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन लाखो रुपये उकळले. याप्रकरणी पंकज अनिल खंडागळे (Pankaj Anil Khandagale) याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) IPC 376, 376 (2)(N), 506, 324, 385, 323, 3,28 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली (Pune Crime) आहे.

 

याबाबत 26 वर्षाच्या पीडित महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते 5 मे या कालावधीत बालेवाडी (Balewadi), चिंचवड येथील लॉजमध्ये वेळोवेळी घडला आहे. फिर्यादी यांनी गुरुवारी (दि.5) तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पंकज अनिल खंडागळे (वय-28 रा. थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

महिला पोलीस उपनिरीक्षक सी.एम. बोरकर (PSI C.M. Borkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या होमिओपॅथी डॉक्टर असून आरोपी आणि त्यांची ओळख कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. आरोपीने मैत्रीच्या संबंधातून फिर्यादी यांना बालेवाडी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.

 

आरोपीने पीडित महिलेला व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालेवाडी आणि चिंचवड येथील लॉजवर बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. याशिवाय पंकज खंडागळे याने पीडित महिलेकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये घेतले. मागील काही दिवसांपासून त्याचा भाऊ अखिलेश खंडागळे (Akhilesh Khandagale) याच्या गुगल पे वर पैसे पाठवण्यास सांगून पीडित महिलेला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी.एम. बोरकर करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! Homeopathic doctor raped by injecting drugs into whiskey pimpri chinchwad of pune


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Central Bank Of India बँकेवर मोठे संकट ! बंद कराव्या लागतील 600 ब्रँच; तुमचे एखाद्या शाखेत खाते आहे का ?

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार