Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून घेतला गळफास, प्रचंड खळबळ

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सांगवी (Sangvi) येथील योगा प्रशिक्षक असलेल्या महिलेनं राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (20 सप्टेंबर) रोजी उघडकीस आला आहे. विशाखा दीपक सोनकांबळे Visakha Deepak Sonkamble (वय 37, रा. सांगवी) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, महिलेनं आत्महत्या का केली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत माहिती अशी की, विशाखा या त्यांचे पती दीपक तसेच 10 वर्षांचा मुलगा व 6 वर्षांची मुलगी यांच्यासोबत सांगवी येथे भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री त्यांचे पती दीपक हे मुलगा व मुलगी यांच्यासह घराच्या हॉलमध्ये झाेपले होते. त्यानंतर विशाखा यांनी बेडरुममध्ये डाव्या हाताची शीर कापली. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास (Suicide) घेतला.

विशाखा यांचा पती दीपक हे सकाळी झोपेतून जागे झाले असता बेडरुममध्ये विशाखा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. यांनतर, पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत विशाखा यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच विशाखा यांचा मृत्यू (Died) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सोनकांबळे यांच्या घरातील डायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, विशाखा सोनकांबळे या योगा प्रशिक्षक म्हणून योगाचे क्लास घेत होत्या.
तसेच पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) स्तरावर विवाहित महिलांसाठी झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता.
तसेच इतर सामाजिक कार्यातही त्या पुढाकार घेत असत.

Web Title :- Pune Crime | Shocking! In Pune, a 37-year-old woman cut off the head of her hand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी – राष्ट्रवादी

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते (व्हिडीओ)