Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुलाकडून अन् सुनेकडून काठीने मारहाण, हात फॅक्चर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या ८० वर्षाच्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण करुन तिचा हात फ्रॅक्चर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) जखमी झालेल्या महिलेच्या 60 वर्षीय मुलावर आणि 55 वर्षीय सुनेविरूध्द गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत बुधवार पेठेत राहणार्‍या 80 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मोठा मुलगा आहे. सोमवारी रात्री ८ वाजता फिर्यादी घरात खाटेवर झोपल्या असताना मोठा मुलगा व त्यांची पत्नी हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करुन “तू आमचा मुलगा सागर याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करते” असे बोलून जमिनीवर पडलेली काठी घेवुन मुलाने आपल्या ८० वर्षाच्या आईच्या हातावर, अंगावर मारहाण केली. त्यांची सून मिना हिने चपलेने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. फरासखाना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! In Pune, an 80 year old mother was beaten by a 60 year old boy with a stick and fractured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ

Benefits of Drinking Warm Water | वजन कमी करण्यापासून ब्लड सर्क्युलेशनपर्यंत, हिवाळ्यात गरम पाण्याचे होतात ‘हे’ 6 मोठे फायदे

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड