Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच गळा दाबून केला पतीचा खून; गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा केला होता बनाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion Of Character) त्रास देणार्‍या पतीचा गळा दाबून खून (Murder In Pune) केल्यानंतर त्याने गळफास (Suicide News) घेतल्याचा पत्नीने केलेला बनाव उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) उघडकीस आणला असून पत्नीला अटक केली आहे. (Pune Crime)

नंदिनी रमेश भिसे ऊर्फ नंदिनी राजू धस (वय ४०, रा. लांडगे निवास, उत्तमनगर) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. रमेश भिसे असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता. (Pune Crime)

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे (API P.M. Waghmare) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व नंदिनी हे पतीपत्नी असून रमेश हा काहीही कामधंदा करीत नव्हता. दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशांची मागणी करत. तिच्या माहेरच्या नातेवाईकांसमक्ष तिला अपमानास्पद वागणूक देत असे. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याने नंदिनी हिला स्वयंपाक करुन दिला नाही, या करणावरुन वादावादी झाली होती. त्यानंतर रमेश हा झोपला. तेव्हा नंदिनी हिने नॉयलॉन दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याची बॉडी उठवून बसविली.

त्याच्या गळ्यात दोरी टाकून ती दोरी लोखंडी हुकास बांधली व पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बनाव केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला व नातेवाईकांना बोलावून पतीने गळफास लावून घेतल्याचे दाखवून त्याचे गळ्यातील दोरी काढून त्याला फरशीवर झोपविले. त्यानंतर पोलिसांना रमेशने गळफास घेतल्याची माहिती दिली. रमेश याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात रमेश याचा मृत्यु गळा आवळून झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आला. त्यावरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन नंदिनी भिसे हिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title : Pune Crime | Shocking ! In Pune, the wife strangled her husband to death; Pretend to have committed suicide by hanging

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर