Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! 15 वर्षाच्या मुलीने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, मागितली 5 लाखांची खंडणी

पुणे / शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका अल्पवयीन मुलीने (minor girl) स्वत:च्या अपहरणाचा (kidnapping) बानाव रचून घरच्यांकडे पाच लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या (Shikrapur Police Station) हद्दीत घडला. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाची (Pune Crime) गांभीर्याने दखल घेत अल्पवयीन मुलीचा अवघ्या सहा तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक माहिती अशी की, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिहार येथील एका मजुरी करणाऱ्या दाम्पत्याची 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात कोणाला न सांगता अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर काहीवेळाने मुलीच्या मोबाईवरुन ‘5 लाख रुपये द्या, पैसे दिले नाहीतर तिचे जीवाचे काही खरे नाही’ असा मेसेज अज्ञाताने तिच्या भावाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp message) पाठवला. भावाने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची गुरुवारी (दि.4) तक्रार दिली.

Bad Food For Kidney | तुमची किडनी खराब करतात ‘या’ 5 गोष्टी, मर्यादित करा सेवन; जाणून घ्या नुकसान

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणा द्वारे तपासाची चक्रे फिरवुन अपहृत मुलगी ही पुणे ते छपरा (Pune to Chhapra) अशी रेल्वेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलीस स्टेशनला (Chapra Railway Police Station) अपहृत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्याचे कळवले. दरम्यान शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पथक छपारा येथे रवाना (Pune Crime) करण्यात आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिच्या मोबाईलवरुन पाठवण्यात आलेला खंडणीचा (ransom) मेसेज तिनेच पाठवल्याचे समोर आले. तसेच तिने स्वत: च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे (Pune Crime) स्पष्ट झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे (Pune Rural) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल धस (Sub-Divisional Police Officer Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge), पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर (PSI Amol Khatavkar), पोलीस नाईक विकास पाटील, किरण निकम, चित्तारे, शिवणकर यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Shocking incident in Pune! 15-year-old girl plotted to kidnap herself, demanded Rs 5 lakh ransom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update