Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! ‘तुझे मेरे लिए ही लाया हू’ म्हणत 47 वर्षीय सासर्‍याकडून 22 वर्षीय सूनेवर बलात्कार

Pune Crime | Shocking incident in Pune! 47 year old father in law raped by 22 year old daughter in law sahakar nagar police station taljai pathar area incident

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नानंतर घरी आलेल्या सूनेला तुझे मेरे लिए ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा, असे म्हणून सासर्‍याने सूनेवर वारंवार बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) तळजाई पठार (Taljai Pathar) येथे राहणार्‍या एका ४७ वर्षाच्या सासर्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत यवतमाळ (Yavatmal) येथील एका २२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ९२/२२) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून आरोपी सासरा हा फिर्यादीस मुलीसारखे प्रेम करीत असल्याचे भासवत होता. फिर्यादी यांची सासू कर्नाटकात गावी गेली होती. फिर्यादीचा पती घरी नसताना सासरा फिर्यादीच्या बेडरुममध्ये आला. त्याने फिर्यादीस बिलगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला दूर लोटले. तेव्हा त्याने ‘‘ तुझे मेरे लिए ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा, ’’ असे म्हणून फिर्यादींना बेडवर पाडले.

 

त्याला फिर्यादीने विरोध केल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. बदनामीच्या भितीने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. फिर्यादी हे कोणाला सांगत नाही, याचा गैरफायदा घेऊन सासर्‍याने तिच्यावर ३ वेळा बलात्कार केला. तिच्याविषयी कुटुंबाला चिथावणी देऊन फिर्यादीविषयी मन कुलषित केले. त्यामुळे फिर्यादी माहेरी निघून गेल्या असून तेथे त्यांनी फिर्याद दिली होती. ती सहकारनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Shocking incident in Pune! 47 year old father in
law raped by 22 year old daughter in law sahakar nagar police station taljai
pathar area incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा