
Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 30 वर्षीय पती ‘नामर्द’ असल्याचं सांगत पत्नीनेच केली समाजात ‘बदनामी’, अन्…
पुणे : Pune Crime | पती व तिच्या सासरच्यांकडून होणार्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिला अखेर पोलिसांकडे धाव घेताना दिसून येतात. मात्र, पत्नीने समाजात बदनामी (slander) करुन मानसिक त्रास दिल्याने एका पतीने पोलिसांकडे धाव (husband and wife quarrel) घेतली असून पोलिसांनी पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
या प्रकरणी रास्ता पेठेतील एका ३० वर्षाच्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
हा प्रकार जानेवारी २०१९ ते २३ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.
फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादीसोबत वारंवार घरगुती कारणावरुन व वेगळे राहण्यासाठी भांडणे करुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमक्या दिल्या.
इतर आरोपी हे फिर्यादीच्या संसारात हस्तक्षेप करुन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार शिवीगाळ करुन त्यांची समाजात बदनामी केली.
फिर्यादी यांच्या पत्नीने मानसिक त्रास देऊन फिर्यादी हे नपुंसक/नामर्द (immature) आहेत असे समाजात खोटे सांगून त्यांची बदनामी केली.
२३ जानेवारी रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून जबरदस्तीने कपाटातील फिर्यादीच्या
आईचे अदांजे ८ ते ९ तोळे सोन्याचे दागिने, २५ तोळे चांदीची पट्टी व पत्नीचे सोन्याचे दागिने घेऊन गेले.
फिर्यादी यांनी न्यायालयात (Pune Court) अर्ज केला होता.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC, Shivajinagar Court) यांच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार, CBI कस्टडी घेण्याच्या तयारीत