Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखालील कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | निकामी झालेला गुडघ्या खालचा पाय डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे कापून काढला. त्यानंतर या पायाची योग्य विल्हेवाट न लावता तो पाय चक्क कचरा पेटीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

डॉ. अजय धोंडीभाऊ मते (Dr. Ajay Dhondiba Mate) आणि सुनिता जाधव (Sunita Jadhav) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील कचरा डेपोत २२ सप्टेंबर रोजी घडली (Pune Crime) होती.

वारुळवाडी येथील कचरा डेपोत एक मानवी पाय मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.
नारायणगाव पोलिसांनी त्याचा तपास केल्यावर हा प्रकार डॉ. अजय मते यांच्या हॉस्पिटलमध्ये घडल्याची माहिती मिळाली.
डॉ. मते हॉस्पिटल येथे एक रुग्ण दाखल झाला होता.
या रुग्णावर उपचार चालू होते.
या रुग्णाचा सडलेला व निकामी झालेला डावा पाय हा डॉ. मते यांनी शस्त्रक्रियेद्वारे गुडघ्याचे खाली नळीपासून कट करण्यात आला होता.
शस्त्रक्रियेनंतर कापलेला पायाची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तेथील डॉ. अजय मते यांनी लक्ष न देता व निष्काळजीपणे तेथील मावशी सुनिता जाधव यांनी हा मानवी पाय कचर्‍यामध्ये टाकून दिला होता.
तपासात हा प्रकार निषन्न झाल्यानंतर हवालदार पोपट मोहरे यांनी फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ (व्हिडीओ)

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Shocking incident in Pune! The leg amputated under the knee by the surgeon was dumped in the trash, with the doctor filing a case against the mother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update