Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी बेडरुमध्ये चाकू घेऊन झोपली, घाबरलेल्या पतीची थेट पोलिसांत धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती पत्नीमध्ये (Wife) वाद झाल्यानंतर पत्नी बेडरुममध्ये (Bedroom) चाकू (Knife) घेऊन झोपल्याने घाबरलेल्या पतीने थेट नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन केला. यानंतर पोलिसांनी (Pune Police) पती-पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून घेत दोघांचा जबाब (Pune Crime) नोंदवला. पोलिसांना फोन केल्याचा रागातून पत्नीने माहेरच्या लोकांना बोलावून घेत पतिला बेदम मारहाण (Husband Beaten) केली. एवढेच नाहीतर घरातील 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry), दोन लॅपटॉप (Laptop), घड्याळ असा एकूण 1 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेली.
याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) पत्नी (वय-28), मेव्हणी (वय-25), मेव्हणा (वय-33), सासू (वय-58)-सासरे (वय-58), निखील शर्मा (वय-23) आणि अशोक मरकडे (वय – 28 सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पती जितेंद्र मुरलीधर भागवत Jitendra Muralidhar Bhagwat (वय-32 रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीबरोबर लग्नानंतर सतत घरगुती वाद (Domestic Dispute) होत होते. याच वादातून अनेकवेळा त्यांचे सासरच्या लोकांशी भांडण झाले होते. फिर्यादी यांच्या सासरचे लोक सतत त्यांच्या संसारामध्ये हस्तक्षेप करत होते. तसेच फिर्यादी यांच्या आईला तुच्छ वागणूक देत होते.
दरम्यान, फिर्यादी यांची पत्नी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपली होती. यानंतर फिर्यादी यांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलावुन घेतल्यावर फिर्यादीने पत्नी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींनी घरी जाऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे (PSI Salve) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking incident in Pune! The wife slept in the bedroom with a knife, the frightened husband ran straight to the police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Indians | रोहित आणि झहीर खानमधील अंतर्गत भेदभाव चव्हाट्यावर; मुंबई इंडिअन्सला बसतोय फटका?