Pune Crime | धक्कादायक ! सॅनफ्रान्सिको ते पुणे विमान प्रवासादरम्यान चोरले ‘सामान’; 45 वर्षीय महिलेकडून एअर फ्रान्स कंपनीमधील कर्मचार्‍याविरुद्ध FIR

पुणे : Pune Crime | सॅनफ्रान्सिस्को ते मुंबई (san francisco to mumbai) अशा प्रवासादरम्यान दोन बॅगांमधील सुमारे दीड लाख रुपयांचे सामानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) एअर फ्रान्स (AirFrance) कंपनीमधील कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी येरवडा येथील त्रिदलनगरमध्ये राहणार्‍या एका ४५ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ५३१/२१) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला २९ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक वेळेनुसार साडेतीन वाजता सॅनफ्रान्सिको ते पुणे या विमानाने (san francisco to pune flight) प्रवास करणार होत्या.
त्यानुसार, त्यांनी सॅनफ्रान्सिको विमानतळावर (san francisco airport) चेक-ईन केले.
त्यावेळी त्यांनी आपल्या दोन बॅगा विमानतळावरील एअर फ्रान्स या विमान कंपनीच्या कर्मचार्‍याच्या ताब्यात दिल्या.
त्या पॅरीसमार्गे मुंबईला परत आल्या.
मुंबई विमानतळावर त्यांना त्यांच्या बॅगा मिळाल्या नाहीत.
त्यामुळे त्यांनी बॅगांचा क्लेम करुन पुण्यातील घराचा पत्ता दिला.

त्यानंतर दोन दिवसांनी ३  ऑक्टोबरला विमान कंपनीने त्यांच्या बॅगा घरी पाठविल्या. त्यांनी बॅगा उघडून पाहिल्या असता त्यात कपडे, गिफ्ट आयटम्स, चॉकलेट, परफ्युम, हॅन्डबॅग, पर्सेस खेळणी असा १ लाख ४० हजार ३६७ रुपयांचे सामान गायब झाले होते. त्यांनी कंपनीकडे याबाबत चौकशी (Pune Crime) केली. परंतु, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एअर फ्रान्स (AirFrance) कंपनीच्या कोणत्यातरी कर्मचार्‍याने या वस्तूंचा अपहार केला, म्हणून त्यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव (PSI Bhagwan Gurav) तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Shocking! Luggage stolen during flight from San Francisco to Mumbai, FIR filed by pune’s 45-year-old woman against Air France employee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update