Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा ‘सामूहिक’ विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातील हेल्पलाईनसाठी (Helpline) ठेवलेल्या मोबाईल क्रमांकावर अश्लिल फोटो (Pornographic photo), मेसेज (Message) पाठवून 4 महिला डॉक्टरांचा (Female Doctors) विनयभंग (Molestation Case in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत एका हॉस्पिटलमध्ये (Pune Crime) घडला आहे.

 

याप्रकरणी तिरुपतीराव गुम्मादी Tirupatirao Gummadi (रा. गंगाधरापुरम कांचिली श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश) याच्यावर आयटी अ‍ॅक्ट (IT ACT) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉस्पिटलमधील 29 वर्षीय महिला डॉक्टरने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) वर्ग केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर या ढोलेपाटील रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. 2018 मध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोपी उपचार (Treatment) करण्यासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फॉलोअप कॉल (Follow up Call) करण्यासाठी मोबाईल ठेवण्यात आले असून यामध्ये व्हॉट्सअप सुरु आहे. हे मोबाईल फिर्यादी यांच्यासह चार महिला डॉक्टर वापरतात. आरोपीने या मोबाईल क्रमांकावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दिपाली भुजबळ (Police Inspector Deepali Bhujbal) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! Mass molestation of 4 female doctors in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | महापालिकेने रामटेकडी येथे ‘डंप’ केलेला कचरा ठेकेदाराकडून सोरतापवाडी येथे ‘रिडंप’?

 

Pune Corona Updates | दिलासा ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 7410 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Multibagger Penny Stock | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने केली कमाल, एका वर्षातच गुंतवणुकदार झाले मालामाल!

 

MP Rajanitai Patil | मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

 

Budget 2022 | अर्थसंकल्प 2022 : कोरोनाने प्रभावित छोट्या दुकानदारांसाठी होऊ शकते भरघोस मदतीची तरतुद, सरकार देऊ शकते आर्थिक मदत