Pune Crime | धक्कादायक ! नशेचे इंजेक्शन देऊन ‘मॉडेल-रॅपर’कडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हिंजवडीतील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | ‘मॉडेलिंग’ करणाऱ्या एका ‘रॅपर बॉय’ने अल्पवयीन मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 25 सप्टेंबर 2020 ते 20 जुलै 2021 या कालावधीदरम्यान घडला. हिंजवडी पोलिसानी (hinjewadi police) याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

समीर विजय भालेराव उर्फ डॉनी सिंग / रॅपबर बॉय Sameer Vijay Bhalerao alias Donnie Singh / Rapper Boy (28, रा. फ्लॅट नं. 316, स्काय स्टार टॉवर, मानस लेक भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर हा रॅपर आहे. तसेच तो मॉडेलिंग (modeling and rapper) करतो. त्याची त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यावेळी ही मुलगी 17 वर्षांची होती. या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. एक दिवस हा तरुण त्यांच्या घरी गेला. त्यानंतर त्याने या मुलीला जबरदस्तीने स्वतःसोबत नेले. तसेच तिच्या अल्पवयीन भावलाही सोबत घेऊन गेला.

या मुलीला घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. तिला बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला.
तिला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या लैंगिक अत्याचाराची माहिती तिने आईवडिलांना दिली.
त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीने या मुलीला आईवडिलांना मारून टाकण्याची धमकीही दिलेली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास हिंजवडी पोलिस (hinjewadi police) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking! Model rapper rapes 17-year-old girl by injecting her with drugs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

Narayan Rane | शिवसेना आमदारचं वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढतो’ (व्हिडीओ)

Pune Crime | भादलवाडीमध्ये गळा चिरुन तरुणाचा खुन