Pune Crime | पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासे ! आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ कंपनीतूनही फुटला, पेपरफुटीच्या दोन लिंक; 28 जणांना अटक, 6 कोटींचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्यात सध्या अनेक पेपरफुटी प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आरोग्य भरती (Health Recruitment) पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच (Nyasa Company) गट ‘क’ चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोन एजंटना पुणे पोलिसांनी (Pune Crime) अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निशीद रामहरी गायकवाड Nishid Ramhari Gaikwad (वय-43 रा. 501 शेवळकर गार्डन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर मुळ रा. 52, आशियाड कॉलनी, शेगांव-रहाटगांव रोड, अमरावती) व त्याचा साथिदार राहुल धनराज लिंघोट Rahul Dhanraj Linghot (वय-35 रा. देवी पार्क, जावरकर लॉनच्या मागे, अमरवाती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी निशीद गायकवाड याने परीक्षेपूर्वीच पेपरफोडून ते एजंट द्वारे परीक्षार्थींकडे दिल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करुन पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली आहे.(Pune Crime)

पेपरफुटीच्या दोन लिंक

आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत.
पहिल्यांदा आरोग्य विभागाचा सह संचालक महेश बोटले (Mahesh Botle), मुख्य प्रशासकी अधिकारी, आरोग्य विभाग लातूर प्रशांत बडगिरे (Prashant Badgire), वैद्यकिय अधिकारी आरोग्य विभाग आंबाजोगाई डॉ. संदीप जोगदंड (Dr. Sandeep Jogdand), राजेंद्र सानप (Rajendra Sanap) यांना अटक करण्यात आली होती.
आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यामुळे या पेपरफुटीच्या दोन लिंक आतापर्यंत तपासात समोर आल्या आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात 18 आरोपींना अटक केली असून यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी, एजंट आणि काही परीक्षार्थींचा समावेश आहे. आरोपींनी 100 पैकी 92 प्रश्न परीक्षेपूर्वीच फोडले होते.

 

तुकाराम सुपेकडून रोख रक्कम, दागिने जप्त

आरोग्य भरती पेपरफुटीचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना म्हाडा परीक्षेचा (MHADA Exam Scam) पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. याच दरम्यान टीईटी परीक्षेचा (TET Exam Scam) पेपर फुटल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करुन पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Maharashtra Commissioner of Examination Council Tukaram Supe), शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक केली. तुकाराम सुपे याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी 3 कोटी 23 लाख 36 हजार 840 रुपये रोख आणि 67 लाख 78 हजार 800 रुपये किंमतीचे 150.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू जप्त केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 6 कोटीच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोग्य, म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकुण 28 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke), सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule), पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Police Inspector D.S. Hake) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट 4 जयंत राजूरकर (Police Inspector Jayant Rajurkar) हे करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Police Inspector minal supe-patil), पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ (PSI Anil Daffal), पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, पुंडलीक, अश्वीन कुमकर, चालक सोनूने, शाहरुख शेख, श्रीकांत कबूले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Shocking revelations from Pune police commissioner amitabh gupta !
Health recruitment paper also leaked from Nyasa company, two links to Paperfooty;
28 arrested, Rs 6 crore confiscated (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर