Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाजीच्या दराची चौकशी आपल्याकडे केली व शेजारच्याकडून भाजी घेतल्याच्या रागातून एका भाजी विक्रेत्याने ग्राहकावर चाकूने हल्ला (Stabbing By Knife) केल्याचा धक्कादायक प्रकार घोरपडीमध्ये घडला आहे. (Pune Crime)

याबाबत घोरपडीमधील उदय बाग (Uday Baug, Ghorpadi,) येथील एका ३४ वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अब्दुल नावाच्या भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

ग्राहक हा देव मानला जात असतो. पण आता त्याने कोणाकडून काय खरेदी करावे, हे विक्रेते ठरविणार की काय असा प्रसंग घोरपडीतील फुटपाथवर घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पबाहेरील फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी एका भाजीविक्रेत्याला भाजीचे दर विचारले. त्याच्याकडील भाजीचे दर जास्त होते. फिर्यादीस न परवडल्यामुळे त्यांनी त्याच्या शेजारी असणार्‍या दुसर्‍या भाजी विक्रेत्याकडून भाजी घेतली. याचा राग आल्याने या भाजी विक्रेत्याने फिर्यादीस लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली. लहान चाकूने फिर्यादीचे हाताचे तळावर वार करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking! vegetable seller Knife attack on customer in Ghorpadi-Wanwadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा