Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 25 वर्षीय विवाहितेची ‘कौमार्य’ चाचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्न झाल्यानंतर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची कौमार्य चाचणी (Virginity test) घेण्यात आली होती. त्यानंतर मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करुन तिला माहेरी हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgardan Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे. त्यावरुन पती आकाश शिंदे (वय २६, रा. ठाणे) याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छळवणूकीचा हा प्रकार ४ जून २०१७ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. आरोपी यांनी फिर्यादीस लग्न झालेपासून वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीची कौमार्य चाचणी (Virginity test)केली. तसेच फिर्यादी यांना मुलगी झाली म्हणून घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले. फिर्यादीचा पती आकाश हा दारु पिऊन शिवीगाळ करुन मारहाण करीत. तसेच त्यांना जानेवारीमध्ये माहेरी पाठवून दिले. त्यानंतर अद्यापपर्यंत घेण्यास आले नाही. फिर्यादी या स्वत: गेल्या असता आरोपी यांनी त्यांचे घर बदलले आहे. तसेच फिर्यादीचे घराच्यांचे फोन घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन मानसिक व शारिरीक छळाची तक्रार (Pune Crime) दिली. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Shocking ! Virginity test of 25-year-old married woman on suspicion of character in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही