Pune Crime | धक्कादायक ! पत्नी, सासु सासर्‍याच्या छळाला कंटाळून जावयाची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील घटना

पुणे : Pune Crime | पत्नीला वेगळे रहायचे असून त्याला सासुसासरे, मेव्हणा हे फुस लावतात़ त्यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरात जावयाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शरद भोसले यांनी चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली असून त्यात संशयी पत्नी व तिचे आईवडिल, भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे (Pune Crime) म्हटले आहे.

सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police) पत्नी प्रियंका शरद भोसले (वय २८), मेव्हणा मनिष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय २७), शंकर शिंदे (वय ५६), रोहिणी शंकर शिंदे (वय ५०, सर्व रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली-Lonikalbhor, Haveli) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे

याप्रकरणी नरेंद्र दत्तात्रय भोसले (वय ५८, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी-dhankawadi)
यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शरद आणि प्रियंका यांचे २०१८ मध्ये लग्न झाले
होते. लग्न झाल्यापासून प्रियंकाला वेगळे रहायचे होते. त्यासाठी ती शरद याच्याशी भांडणे करीत व
माहेरी निघुन जात असे. माहेरी तिचे आईवडिल तिला फुस लावत असत. प्रियंका शरद याच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याच्याशी भांडणे करीत होती. काही दिवसांपूर्वी शरदचा मेव्हणा मनीष याने त्यांच्यातील भांडणे मिटविण्यासाठी शरद व त्यांच्या वडिलांना मार्केटयार्ड परिसरात बोलावून घेतले होते. तेथे त्याने दोघांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.

पत्नीची सातत्याने करीत असलेल्या तक्रारी व माहेरी निघून जाण्याच्या प्रकाराने शरद याने कंटाळून २९ ऑगस्ट रोजी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शरद याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणे व सासु सासरे तिला भडकावितात. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे (API Umesh Londhe) अधिक तपास करीत आहेत. गोखलेनगरमधील निखिल शाम धोत्रे (वय २९) या तरुणाने २२ ऑगस्ट रोजी पत्नी व सासु सासरे यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

हे देखील वाचा

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Shocking! Wife commits suicide by strangling mother-in-law, incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update