Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीचा चाकूने गळा कापून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. अश्विनी सचिन काळेल (Ashwini Sachin Kalel) (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबध असल्याच्या रागातून हा खून केला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

 

याबाबत माहिती अशी की, सचिन काळेल (Sachin Kalel) असं त्या पतीचं (आरोपी) नाव आहे. सचिनची पत्नी अश्विनी काळेलचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. या सर्व प्रकाराबाबत अश्विनीच्या कुटुंबीयांना आणि सासरच्या मंडळींना सर्व कल्पना होती. घरच्यांनी आणि सासरच्यांनी विरोध करूनही अश्विनी पतीला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत होती. आरोपी पती सचिनने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत अश्विनीला तिच्या पतीसोबत किंवा तिच्या कुटुंबीयांकडे राहण्याचा सल्ला दिला होता. पण ती प्रियकरासोबतच राहत होती. (Pune Crime)

 

दरम्यान, पती आणि कुंटूबीयांनी सांगून देखील अश्विनी ऐकत नव्हती. दरम्यान, मंगळवारी रात्री अश्विनी आणि तिचा पती सचिन हे एकत्र झोपले आणि सकाळी 5 वाजताच्या सुमारास दोघांत वाद झाला. हाच वाद पुढे विकोपाला गेला. सचिनने आपल्या पत्नीचे उशीने तोंड दाबले. आणि चाकुने गळा कापून तिची हत्या (Murder In Pune) केली. यानंतर आरोपी सचिनला पोलिसांकडून अटक (Arrested) करण्यात आले.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Shocking Wife stabbed to death in anger over immoral relationship

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा