Pune Crime | ‘वसुली’साठी अपहरण करुन 4 दिवस ठेवले डांबून; सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | व्यवसायासाठी दिलेले हात उसने पेसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रोडवरुन (Sinhagad Road) अपहरण करुन (Kidnapping Case) चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

सनी सुनिल छजलाणी Sunny Sunil Chhajlani (वय 31, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान /उमर समीर शेख (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पक्या, अभिजित, मयुर, शादाब अशा इतरांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

हा प्रकार सिंहगड कॉलेज कॅम्पस (sinhgad college campus) येथील क्युबाना कॅफे येथून सिंहगड रोडवरील गोयलगंगा येथे 10 ते 14 जानेवारी दरम्यान घडला. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय ३१, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण व त्यांचा भाऊ गोविंद चव्हाण यांनी व्यवसायासाठी सनी छजलाणी याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत न केल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. राहुल हा 10 जानेवारी रोजी क्युबाना कॅफे येथे असताना सनी इतरांना घेऊन तेथे आला. त्याने राहुल याला मारहाण करुन जबरदस्तीने त्याचे अपहरण करुन आपल्या घरी नेले. तेथे त्याला डांबून ठेवले. त्या ठिकाणी मारहाण करुन पैसे परत नाही केले तर तुला जिंबत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 14 जानेवारी रोजी सुटका केल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Sinhagad Road Police Arrest Two In Kidnapping Case 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात