Pune Crime | कोणताही पुरावा नसताना खुनाच्या गुन्हयाचा 48 तासाच पर्दाफाश, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) धायरी येथे गुरुवारी (दि.7) रात्री सातच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा हाती नसताना सिंहगड पोलिसांनी (Sinhagad police) मयत वक्तीची ओळख पटवून 48 तासाच्या आत आरोपीला अटक (Accuse arrest) केली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) धायरी येथील पोकळेनर (Poklener, Dhayari) मधील एका पाऊलवाटेवर घडली होती.

मंगल प्रसादसिंग गुप्ता (Mangal Prasad Singh Gupta) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम भगवान पुयड Shubham Bhagwan Puyad (वय- 25 वर्षे रा. अंबाईंदरा धायरी पुणे, मुळ राहणार मु.पो. वडगाव. ता. जि. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. मयत मंगल हा मागील 25 वर्षापासून धायरी परिसरात राहण्यास असून तो मिळेल तेथे काम करुन सायंकाळी दारु पिऊन मिळेल त्या ठिकाणी झोपत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर आरोपी हा एका हॉटेलमध्ये कामाला असून त्याने या गुन्ह्याची (Pune Crime) कबुली दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला. परिसरात मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवली होती. मात्र, आरोपीचा शोध घेणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तपसादरम्यान पोलीस अंमलदार सुहास मोरे (Suhas More) यांना माहिती मिळाली, घटनेच्या दिवशी (Pune Crime) घटनास्थळाच्या आजूबाजूला एक व्यक्ती घुटमळत होता आणि तो घाबरलेला दिसत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरुन आरोपीचा परिसरात शोध घेतला.

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

पोलिसांना मिळालेल्या वर्णचा व्यक्ती अंबाईदरा येथील हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांकडून माहिती घेतली जात असताना हॉटेल मालकाने एक कामगार दोन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील कामगार शुभम पुयड याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशी दरम्यान, आमच्या शाब्दिक चकमक झाल्याने रागाच्या भरात मंगल गुप्ताचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सहपोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal), पोलीस अमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार,
किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे, इंद्रजित जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बांदल, विकास पांडोळे यांनी केली.

हे देखील वाचा

Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Sinhagad Road police crack down on murder case without any evidence within 48 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update