Pune Crime | धक्कादायक ! 9 वर्षाच्या अनाथ पुतणीचे नराधम काकाच करायचा ‘लैंगिक’ शोषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आई वडिलांचा मृत्यु झाल्यानंतर भावा बहिणीचा सांभाळ करणारा काकाच आपल्या 9 वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार (Rape) करीत असल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) वडगावमध्ये राहणार्‍या 49 वर्षाच्या काकाला अटक केली आहे. हा प्रकार 13 डिसेबर 2018 पासून 25 नोव्हेबर 2021 या कालावधीत घडत होता. पिडित मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्याच इमारतीत राहणार्‍या एका महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

 

याबाबतची माहिती अशी, आईवडिलांचा मृत्यु झाल्याने 9 वर्षाच्या या पिडित मुलगी व तिच्या भावाचा काका सांभाळ करीत आहे. त्याने 13 डिसेबर 2018 रोजी या मुलीवर प्रथम लैगिक अत्याचार (Rape Case) केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या भावाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करु लागला. त्यांच्याच इमारतीत राहणार्‍या एका महिलेच्या फिर्यादीवरुन सिंहगड रोड पोलिसांनी काकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | sinhagad road police station arrest one who rape on 9 years old girl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा