Pune Crime |  बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याचा प्रयत्न, खडकी बाजार परिसरातून तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांगलादेशातून  बनावट नोटा (Fake Notes) आणून  तस्करी करण्याच्या प्रयत्नात (Smuggling Attempt) असलेल्या तिघांना लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या (एमआय) माहितीवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence (DRI) अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई (Pune Crime) शुक्रवारी रात्री उशिरा खडकी बाजार (Khadki Bazaar) परिसरात करण्यात आली.

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तीन आरोपींची माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)  पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खडकी परिसरात एकाला ताब्यात (Arrest) घेतले. त्याच्याकडून भारतीय चलनातील  (Indian Currency) 500 रुपये मूल्याच्या 400 नोटा जप्त करण्यात आल्या.

याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन -FICN) बाळगल्या प्रकरणी  गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
कारवाईत पुणे कस्टमच्या अधिकार्‍यांसह डी आर आय पथकाने सहभाग घेतला होता.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime |  smuggling attempt by bringing fake notes from bangladesh in pune three arrested crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्‍यांची दैना दिसेल काय? शिवसेनेचा सवाल

Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा जोर कायम, पुढील 4 दिवस कशी असेल स्थिती, राज्यातून पाऊस कधी जाणार?, जाणून घ्या