Pune Crime | दुबईवरून दिड कोटींच्या सोन्याची तस्करी; कोंढव्यातून अटक झालेल्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुबईवरून विमानाने पुण्यात (dubai to pune) एक कोटी पाच लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी (Pune Crime) केल्याप्रकरणी एका जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Additional District and Sessions Judge V. A. Patravale) यांनी आदेश दिला. अर्शद अहमद असे जामीन अर्ज फेटाळलेल्याचे नाव आहे. दुबईतून पुण्यात आलेल्या विमानामध्ये सोने तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क (Customs) खात्याच्या विमानतळ गुप्तचर विभागाला मिळाली होती. या तस्करीवर लक्ष ठेवून विभागाने झुबेर पेणकर, महम्मद फरहान, अमीन देशमुख, अब्दुल झमाणे या आरोपींकडून दिड कोटी रुपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त केले. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी अर्शद अहमदचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याला २४ जून रोजी कोंढव्यातून अटक (Pune Crime) करण्यात आली होती.

येरवडा कारागृहात (yerwada jail) रवानगी झाल्यानंतर अर्शद याने जामीन मिळण्यासाठी अर्ज

केला होता. सीमा शुल्क खात्याच्या गुप्तचर विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप घाटे
(Special Public Prosecutor Sandeep Ghate) यांनी या जामीन अर्जाला विरोध केला.
आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. त्यावर आरोपीचा
या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्याला जामीन झाल्यास तो
पळून जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ॲड. घाटे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या
निकालाचा दाखल दिला. ॲड घाटे यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज
फेटाळला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व केंद्र सरकारविरोधातील असून, त्याचा तपास पूर्ण झाला
नसल्याने आरोपीला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद ?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Smuggling of Rs 1.5 crore gold from Dubai; The court rejected the bail application of the person arrested from Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update