Pune Crime | …म्हणून ‘कात्रजचा खून झाला’, खून का झाला याचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील (Pune Crime) कात्रजमध्ये एका खाजगी जागेत ‘कात्रजचा खून झाला’ (Murder of Katraj) अशा आयशाचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता. यानंतर कात्रजचा खून का झाला ? (Pune Crime) याचा उलगडा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल (Video goes viral) होत आहे. या व्हिडिओत कात्रज मधून साक्षात यमराजांचा (Yamraj) भ्रमणध्वनी कुबेर देवांना (Kuberdev) गेला असल्याची सुरुवात करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, यम कुबेरदेवासोबत बोलत असल्याचे दिसत आहे.
यामध्ये यम कुबेर देवाला यमलोकातील त्याचे मुख्यालय (headquarters in Yamalok) बदलून कात्रजमध्ये केल्याचे सांगत आहेत.
त्यामुळे यमाचा मुक्काम सध्या कात्रजला कात्रज चौकात (Katraj Chowk) हलविले असल्याचे सांगत आहेत.
यम पुढे म्हणतात, कात्रजला आलो अन् मोठे घबाड हाती लागले आहे.
या ठिकाणी खूप वाहतूक कोंडी (Traffic jam) आहे. मोठे अपघात होतात. (Pune Crime)

यम पुढे सांगतात, आमचा रेडा नो पार्किंगमध्ये (No parking) लावला होता. त्याला देखील उचलून नेले.
कात्रज चौकात डोळ्यादेखत माणसं मरताना पाहिली आणि ठरवलं यमराजाचे मुख्यालय आता कात्रलाच केले पाहिजे.
तसेच यम कुबेरदेवाला सांगातात की, प्रेत उचलून नेण्याचा खर्च वाढला असल्याने निधीत भरीव तरतूद करण्याची मागणी करत आहेत.
तसेच यम कात्रजला भेट देऊन टार्गेट कसे पूर्ण होते हे एकदा पहाच असे ते म्हणत आहेत.

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यम आणि कुबेर यांच्यातील संवादामध्ये एक मावळा बोलताना दिसत आहे.
तो म्हणतो, कीती जणांचा जीव घ्यायचा ठरवला आहे ? असे किती दिवस डोळे झाकायचे ठरवले आहे ? आमचा खून झाला आहे, या कात्रजचा खून झाला आहे.
आजपर्यंत या चौकामध्ये 275 बळी गेले आहेत.
अजून किती जणांचा बळी घेणार आहात ? ही अघोषित हत्या नाही तर काय आहे ? एक गोष्ट लक्षात घ्या,
पुण्याच्या नकाशामधून कात्रजला जर उपरा समजून बेदखल केले जाणार असेल तर रितसर कात्रजचा घाट (Katraj Ghat) दाखवण्यात येईल, असे मावळा म्हणतो.
तसेच आता माघार नाही असेही म्हटले असून एका कात्रजकराच्या वतीने हे सवाल व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Crime | so katraj was killed now the video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hutatma Express | …म्हणून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान बंद

Haryana Government | खुशखबर ! शेतकर्‍यांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 40,000 रुपये, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी