Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

अनंत रमेश पाबळे Anant Ramesh Pabele (वय ४०) आणि रमेश केशव पावळे Ramesh Keshav Pavle (वय ७२, दोघे रा. टेल्को कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर (Hadapsar) येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कौटुंबिक न्यायालयात (Family Court) त्यांचा पोटगीचा खटला सुरु आहे.

या खटल्यात अनंत पाबळे यांनी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी काही एस्तऐवज सादर केले. त्यात फिर्यादी यांना पोटगी मिळू नये, म्हणून त्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत, असा खोटा दस्तऐवज बनवून तो शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात सादर केला. तो खरा आहे, असे न्यायालयास सांगून त्यांनी फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Titel :  Pune Crime | … so submitted fake documents made in court! Case filed against husband and father-in-law

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट !
थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा   तसेच LIVE VIDEO पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा