Pune Crime | हत्या की आत्महत्या ? पुण्याच्या कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यामध्ये एका सॉफ्टवेअर अभियंत्याचा (software engineer) मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील (Pune Crime ) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. गणेश यशवंत तारळेकर Ganesh Yashwant Tarlekar (वय-47) असे मृत सॉफ्टवेअर अभियंत्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्यांनी गोळी झाडून (shooting) आत्महत्या (Suicide) केल्याचे सांगितले. मात्र पुणे पोलिसांना यामध्ये काही तरी काळेबेरे वाटत असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत गणेश (software engineer Ganesh Yashwant Tarlekar) हे विवाहित असून त्यांना 14 वर्षाचा मुलगा आहे.
त्याची पत्नी सध्या माहेरी राहते. तीन दिवसांपूर्वी ते राहत्या घरी काही मित्रांसोबत एकत्र बसले होते.
पार्टी सुरु असताना त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे त्यांच्यासोबत असलेले मित्र सांगतात.
हा प्रकार घडल्यानंतर मात्र त्याच्यासोबत असलेले दोन्ही मित्र घटनास्थळावरुन पसार झाले होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. गणेश तारळेकर यांचा मृतदेह (Dead Body) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवून दिला.
गणेश यांचा खून (Murder) झाला की त्यांनी आत्महत्या (Suicide) केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात (Pune Crime) घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
पुढील तपास पोलीस (Kondhwa Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | software engineers body was found kondhwa residence investigation is going on murder or suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amitabh Bachchan | सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘पॅरिस’हुन परतल्या सुनबाई.

Aryan Khan Drug Case | शाहरूख खानचा मुलगा आर्यनमुळं माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

Facebook New Design | फेसबुकचा मोठा निर्णय ! FB आत नव्या ‘रंगात’ अन् नव्या ‘ढंगात’, जाणून घ्या काय-काय होणार बदल