Pune Crime | प्रसिद्ध सराफी पेढीच्या संचालकाच्या नावाने स्टेट बँकेला सायबर चोरट्यांनी घातला 19 लाखांना गंडा

पुणे : Pune Crime | चंदुकाका सराफ या सराफी पेढीचे संचालक किशोरकुमार शहा यांच्या नावाने बँकेत फोन करुन आरटीजीएसद्वारे 19 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावून सायबर चोरट्यांनी स्टेट बँकेला 19 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष जवखेडकर (वय ४६, रा. बसंतबहार सोसायटी, बाणेर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बंडगार्डन येथील मुख्य शोत चंदुकाका सराफ अँड सन्स या नावाने कंपनीचे चालू खाते आहे. त्यावर तिघांना सह्याचे अधिकार आहेत. २० डिसेबर रोजी फिर्यादी हे बँकेत असताना त्यांना एका क्रमांकावरुन फोन आला. समोरुन बोलणार्‍याने आपण चंदुकाका सराफमधून संचालक किशोरकुमार शहा बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिटमध्ये २ कोटी रुपये ठेवण्याबद्दल व्याज दराची चौकशी केली. त्यानंतर म्युचल फंडामध्ये गुंतवणुक करण्याबद्दल चौकशी केली.

म्युचल फंडामध्ये गुंतवणुक करावयाची असल्याचे सांगून सांयकाळी ६ वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतरही त्यांनी दोन – तीन वेळा फोन करुन आपण किशोरकुमार शहा बोलत असल्याचे सांगून त्यांच्या मनावर ठसविले. त्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक यांचे मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यामुळे त्यांना ९ लाख ५० हजार आणि ७ लाख ५५ हजार रुपये असे दोन आरटीजीएस तात्काळ करावयाचे असल्याचे सांगून मेलवर त्या बँक खात्याची माहिती पाठविल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी बँकेला आलेला मेल तपासला. त्यात चंदुकाका सराफ या कंपनीच्या खात्यावर रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगितले व सायंकाळी ६ वाजता ऑफीसला येताना आरटीजीएस फॉर्म सही करण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी चौकशी केली. तेव्हा एच डी एफसीचे दोन बँक खाते दिले होते. कंपनीचे चेक बुक संपल्यामुळे त्यांना आरटीजीएसद्वारे तात्काळ व्यवहार करायचे आहे, असे नमूद केले होते. त्याचवेळी किशोरकुमार शहा यांचा वारंवार फोन येत होते. (Pune Crime)

पैसे पाठविले जास्त

त्यांनी ९ लाख ५० हजार आणि ७ लाख ५५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले होते.
पण, सातत्याने त्यांचा फोन येत असल्याने फिर्यादी यांनी घाईगडबडीत दोन्ही खात्यांवर ९ लाख ५० हजार
रुपये प्रत्येकी असे १९ लाख रुपये ईमेलमध्ये सांगितलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम पाठविली.
ती त्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाली. तसे त्यांनी शहा यांना फोन करुन सांगितले.
तेव्हा त्यांनी त्याचे व्हाऊचर तयार ठेवा, ही बँकेमध्ये येऊन सही करतो, असे सांगितले. (Pune Crime)

त्यानंतर काही वेळाने चंदुकाका सराफ यांच्या कंपनीतून तेथील कर्मचारी यांनी बँकेत फोन करुन चौकशी केली.
तेव्हा शहा यांचे फोन व ई मेलची माहिती यावरुन पैसे ट्रान्सफर केल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानंतर कंपनीतून बँकेला हा आमच्या कंपनीचा ई मेल नसून अशा प्रकारे कोणताही व्यवहार करण्याची
परवानगी त्यांचेकडून देण्यात आली नसल्याचे बँकेच्या सहायक व्यवस्थापक अपर्णा शेडे यांना सांगितले.
त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे आर टी जी एस विभाग व एच डी एफ सी बँकेचे आर टी जी एस विभागास
ई मेल करुन हा व्यवहार थांबविण्यास सांगितले.
त्यानंतर एच डी एफ सी बँकेतून यातील काही पैसे आय सी आय सी आय बँक खात्यामध्ये ट्रान्सफर
झाल्याचे सांगण्यात आले. त्याने त्या बँकेला हे व्यवहार थांबविण्यास कळविण्यात आले.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर (Senior Police Inspector Mankar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | State Bank was robbed of 19 lakhs by cyber thieves in the name of the director of the famous Sarafi Pedhi.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’