Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावर अवैध मळी टँकरवर कारवाई, 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावरील (Pune-Mumbai Highway) वरसोली येथील टोलनाक्यावर (Versoli Tolanaka) अवैध मळीची वाहतूक करणारा मळी टँकरवर कारवाई करण्यात (Pune Crime) आली आहे. या कारवाईत टँकरसह 23 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अजमेरसिंग रामकीशनसिंग हरीयाना (Ajmer Singh Ramkishan Singh Haryana) याच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन त्यास अटक (Arrested) करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक 26 मार्च रोजी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty), पुणे भरारी पथक क्रंमाक 1 (Pune Bharari Squad No. 1) ने केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली येथील टोलनाक्यावरुन अवैध मळीची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रंमाक 1 ला मिळाली. या माहितीनुसार पथकाने सापळा रचला. त्यानंतर वाहनचालक अजमेरसिंग रामकीशनसिंग हरीयाना याला ताब्यात घेऊन टँकरसह 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजमेरसिंग याला अटक (Arrested) करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील (Police Inspector S. L. Patil) करीत आहेत. (Pune Crime)

 

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप (Kantilal Umap), दक्षता व अमंलबजावणीच्या संचालक उषा वर्मा (Usha Verma), विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे (Prasad Surve), पोलिस अधीक्षक संतोष झगडे (Santosh Zagade) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील (Police Inspector S. L. Patil), भरारी पथकाचे पोलिस निरीक्षक विठ्ठल बोबडे (Vitthal Bobade), संजय सराफ (Sanjay Saraf), बी. एस. घुगे (b. S. Ghuge), एस. आर. राठोड (S. R. Rathod),
दिपक सुपे (Deepak Supe), स्वाती भरणे (Swati Bharne),
चंद्रकांत नाईक (Chandrakant Nai), सुरज घुले (Suraj Ghule),
गणेश वावळे (Ganesh Wavale), अंकुश कांबळे (Ankush Kamble),
मुंकूंद पोटे (Munkund Pote), जयराम काचरा (Jairam Kachra), राहूल जौंजाळ (Rahul Jaunjal) यांनी केली.

Web Title :- Pune Crime | State excise department Action on illegal sludge tanker on Pune-Mumbai highway, 23 lakh 75 thousand items confiscated


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar On Pune Water Supply | पुणे महापालिकेने शहरात समान पाणी मिळेल यासाठी योग्य व्यवस्थापन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

Malaika Arora Oops Moment | फॅशनच्या नादात मलाइका अरोरा झाली Oops Moment ची शिकार, व्हायरल फोटोमध्ये दिसले अंतरवस्त्रे..

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांवर आमदार सुनील टिंगरे यांनी आणला हक्कभंग ! विकास कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने होणार कारवाई