Pune Crime | पुण्यातील विनयभंग प्रकरणात राज्यस्तरीय टेनिस खेळाडूचा जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनयभंग प्रकरणात (Pune Crime) आरोपी असलेल्या राज्यस्तरीय खेळाडूला (state-level player) पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पोंक्षे (Additional Sessions Judge S.P. Ponkshe) यांनी जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. पृथ्वीराज दत्ता पाटील (वय-22 रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

आरोपी पृथ्वीराज पाटील (Prithviraj Datta Patil) याच्यावर 17 वर्षाच्या मुलीने विनयभंग केल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) केली होती. याप्रकरणात पाटील याला निगडी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने अ‍ॅड. प्रसाद निकम आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज (Application for bail) केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.28) सुनावणी झाली.
त्यावेळी आरोपींच्या (Pune Crime) वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पृथ्वीराज पाटील याचा जामीन मंजूर केला आहे.

आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. तन्मय देव यांनी कोर्टाला सांगितले, आरोपीने फिर्यादीवर कोणतेही लैंगिक अत्याचार केले नाही.
आरोपी हा राज्यस्तरीय टेनिस खेळाडू असून त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी फिर्यादी यांनी हे आरोप केले आहेत.
तसेच फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत कुठेच लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख केलेला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. देव यांनी केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर करताना आरोपीला दर सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | State level tennis player granted bail in Pune molestation case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update