Pune Crime | पुण्यातील उद्योजकाच्या बंगल्यात सापडले एअर रायफल, 31 काडतुसे, नोटा मोजण्याच्या 2 मशीन; 70 लोकांकडून घेतलेले वीना सह्यांचे खरेदी खत जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील (Aundh) गायकवाड कुटुंबीयांच्या (Gaikwad Family) घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात पोलिसांना ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, 31 जीवंत काडतुसे असलेले 32 कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशीन आणि नानासाहेब गायकवाड, संजीव मोरे व इतर 70 लोकांकडून खरेदी खत तयार केलेले व त्यावर कोणाच्याही सह्या नसलेले खरेदी खत मिळून आले आहे.

या प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड Nanasaheb Shankarrao Gaikwad (वय 70), नंदा नानासाहेब गायकवाड Nanda Nanasaheb Gaikwad (वय 65) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड Ganesh Nanasaheb Gaikwad (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांच्या पोलिस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Mocca Judge S. R. Navander) यांनी हा आदेश दिला.

पोलिसांना गायकवाड यांच्या घरात दोनपानी कागद मिळाला असून त्यावर 14 लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहण्यात आली आहे. त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर ईलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडाछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाईल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशीन मिळून आली आहे, अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे (Public Prosecutor Vijay Fargade) यांनी शुक्रवारी न्यायालयास दिली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

नंदा गायकवाड हीने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र व इतर पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने इतर ठिकाणी हलविले आहे. नानासाहेब गायकवाड हे नेहमी रिव्हॉल्वर सोबत ठेवत. गणेश गायकवाड हा तो वापरत असेलेल मोबाईल मुंबई येथे विसरला असल्याचे चौकशीमध्ये सांगत आहे, अशा बाबी पोलिस तपासात निष्णन्न झाल्या आहेत. गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. फरगडे यांनी केली.
मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे (Adv. Pushkar Durge) ,
ॲड. सचिन झालटे (Adv. Sachin Zalte), ॲड. ऋषिकेश धुमाळ (Adv. Rishikesh Dhumal)
यांनी कामकाज पाहिले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Stocks of firearms, air rifles, 31 cartridges, 2 note counting machines and 70 purchase documents found in Nanasaheb Gaikwad’s bungalow in Aundh, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Digital Currency in India | भारतात कधी सुरू होऊ शकते डिजिटल करन्सीची ट्रायल? RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजना ! ‘एस.जी.आय.’ सल्लागार कंपनी प्रकल्पातून बाहेर पडली, नवीन सल्लागार नेमण्याचा खर्च वाढला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या इतर आकडेवारी